सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 क्राईम

आंबेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३ गावठी पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त, तिघांना अटक

डिजिटल पुणे    11-08-2026 17:53:44

पुणे : आंबेगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ३ गावठी पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जांभूळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द परिसरातील मोकळ्या जागेत काही इसमांकडे अग्निशस्त्रे असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजन विनोद शहा (वय २३, रा. पोखळे क्रिस्टल सोसायटी, काळभैरवनाथ मंदिरासमोर, धायरीगाव), अनिल कैलास चौधरी (वय २६, रा. संदेश रेसिडेन्सी, धायरीगाव) आणि प्रथम अरुण पेणुरे (वय २४, रा. जाधव हाइट्स, भैरवनाथ मंदिरामागे, नाईक आळी, धायरीगाव) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे १ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिसांनी केली. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती