सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
  • पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
  • एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री बनवण्यात आलं, त्यांनी कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर केली; ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाची चिरफाड
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 शहर

नॉटिंगहॅम विद्यापीठातील डॉ. निखिल अजित देशपांडे यांची एआय, रोबोटिक्सवर पुण्यात व्याख्याने

डिजिटल पुणे    13-08-2026 15:06:00

पुणे : नॉटिंगहॅम विद्यापीठ (इंग्लंड)मधील रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ. निखिल अजित देशपांडे यांच्या 'एआय आणि रोबोटिक्स' विषयावरील विशेष व्याख्यानांचे आयोजन पुणे आणि सातारा येथील शैक्षणिक संस्थामध्ये करण्यात आले आहे. दि.१८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील आयआयएस्ईआर (पाषाण) येथे दुपारी दीड वाजता, दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था येथे तसेच त्यानंतर  मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॅालेज (कर्वेनगर),अभिनव शिक्षण संस्थेचे इंजिनियरिंग कॅालेज (नऱ्हे) भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज(धनकवडी) येथे ही व्याख्याने होणार आहेत.

 मूळचे पुण्याचे असलेले डॉ.देशपांडे हे नॉटिंगहॅम विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागात कार्यरत असून ‘सायबर-फिजिकल हेल्थ अँड असिस्टिव्ह रोबोटिक्स टेक्नॉलॉजीज’  या संशोधन समूहाचे ते उप-प्रमुख आहेत. रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील १७ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. देशपांडे यांचे संशोधन प्रामुख्याने आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण तंत्रज्ञानावर केंद्रित आहे. शस्त्रक्रियेसाठी सहाय्यक रोबोटिक्स, दूरस्थ रोबोट नियंत्रण, पुनर्वसनासाठी एआय आधारित प्रणाली तसेच विशेष कौशल्यांच्या प्रशिक्षणासाठी रोबोटिक्स आणि मिश्र-वास्तव (mixed reality) तंत्रज्ञान यावर ते संशोधन करतात.

निखिल देशपांडे यांनी २०१२ मध्ये अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी मधून रोबोटिक्सवर केंद्रित पीएचडी प्राप्त केली आणि त्याआधी २००३ मध्ये पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी पूर्ण केली.रोबोट मॅनिप्युलेशन, यांत्रिक रचना, मशीन लर्निंग, आणि संगणकीय दृष्टी (computer vision) या क्षेत्रांतही त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. एआय आणि रोबोटिक्समधील वेगाने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर, डॉ. देशपांडे यांच्या व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांना या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध उपयोगांची तसेच भविष्यातील संधींची माहिती मिळणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती