सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवर राज ठाकरे संतापले; ‘ज्यांना सत्ता दिली, त्यांनाच जाब विचारा’
  • शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
 शहर

पोलिस मित्र संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात;'पोलिसांचे प्रश्न पोटतिडकी ने मांडण्याची गरज'; २६/११ मुंबई हल्ल्यातील पोलीस शौर्याचा धडा शालेय अभ्यासक्रमात घ्या: राजेंद्र कपोते

डिजिटल पुणे    14-08-2026 12:01:49

पुणे : पोलिस मित्र संघटनेच्या  ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पोलीस दलात उत्कृष्ट  कामगिरी बजाविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, नगरसेवक अपूर्व खाडे,नगरसेविका पूजा जागडे,आरती चौंधे,सामाजिक कार्यकर्ते संदीप चिलेकर, चेतन शिंदे, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचे आरोग्य उपक्रमांचे समन्वयक राजेंद्र परदेशी,कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र कपोते, सनी निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  पत्रकार राधिका वळसे -पाटील, पत्रकार हिरा श्रीरंग सरवदे यांचा पत्रकारितेतील कामगिरीसाठी सन्मान करण्यात आला.पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  राजेंद्र निकाळजे, रूणाल मुल्ला, प्रसाद गणपतराव गज्जेवार, उत्तम ज्ञानू भजनावळे, सचिन पलांडे, यांचा सन्मान करण्यात आला, तर सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल केअर टेकर सोसायटीचे कुमार शिंदे, पंजाब कल्चरल असोसिएशनचे कश्मिरी नागपाल, विवान फाऊंडेशनचे अध्यक्ष उषा धुमाळे -भालेराव, सामाजिक कार्यकर्ते शिवराज शेलार,लतेंद्र भिंगारे, शाम सिसोदे, यश धोका, विश्व सिंधी सेवा संगम आदी संस्थांचा सन्मान करण्यात आला.हा कार्यक्रम १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता झाला.सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कपोते यांनी केले.प्रास्ताविकात पोलिस मित्र संघटनेच्या स्थापनेची तसेच आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली.ही संघटना १९८७ सालापासून पोलिसांच्या सन्मान,अधिकारासाठी कार्यरत आहे.  '२६ /११ मुंबई हल्ल्यातील पोलिसांच्या शौर्याचा धडा शालेय अभ्यासक्रमात घ्यावा', अशी मागणी कपोते यांनी केली.सिद्धार्थ शिरोळे म्हणाले,'प्रत्येक जणाने असे निस्वार्थ भावनेने काम केले तर देशाचे खूप  कल्याण होईल. कपोते यांच्या संघटनेचे काम अतिशय सकारात्मक आहे, आणि पोलिसांचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडतात आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते खूप अभिनंदनीय आहे. तुम्ही केलेल्या मागण्या मी नक्कीच मुख्यमंत्र्यां पर्यंत मांडेन.

सिसिटिव्हीचे प्रकल्पांचा ही जोमाने पाठपुरावा करेन '. संजय पाटील म्हणाले,'पुणे असे ठिकाण आहे की येथील संघटना मैदानात उतरून पोलिसांचे प्रश्न मांडत आहेत, पोलिसांना स्वतः ची संघटना स्थापन करण्याची परवानगी नसते, त्यामुळे अशा पोलीस मित्र संघटनेचं काम कौतुकास्पद आहे. अशा अनेक प्रश्नांसाठी अशा पोलीस मित्र संघटनेची आवश्यकता भासते.पोलीस खात्यात  त्रास सहन करावाच लागतो, एकप्रकारे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो ! पोलिसांशी ज्यांचा संबंध नाही ते पोलिसांना वाईट मानतात, तेंव्हा ही प्रतिमा चांगली करण्यासाठीही या संघटनेची आवश्यकता आहे'. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.


 Give Feedback



 जाहिराती