सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिक-रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; महाजनांकडे नाशिकची धुरा, गोगावलेंची रायगडवर नियुक्ती
  • 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
 शहर

अजितदादांचा विकासाचा वारसा पुढे नेणार; सुनेत्रा पवारांचा निर्धार, महिलांसाठी ‘दादा उद्योगिनी’ ॲपचे लोकार्पण

डिजिटल पुणे    17-08-2026 14:42:26

पुणे : अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारलेले काम आणि पाहिलेले प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न पुढे नेण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. ‘‘अजितदादांनी दिलेला विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणे त्यांच्या शिकवणीत बसत नाही. त्यांच्या विचारांना पुढे नेत प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे,’’ असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिलांसाठी ‘दादा उद्योगिनी’ आणि युवकांसाठी ‘एनसीपी यूथ स्किल्स’ या दोन ॲपचे लोकार्पण सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी डिजिटल माध्यमातून महिला आणि युवकांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

महिलांना व्यवसायासाठी नवे व्यासपीठ

‘दादा उद्योगिनी’ ॲपच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेसाठी आवश्यक मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी आणि त्यांच्या कौशल्याचे व्यवसायात रूपांतर व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

युवकांसाठी कौशल्यविकासावर भर

‘एनसीपी यूथ स्किल्स’ ॲपच्या माध्यमातून युवकांना कौशल्यविकास, रोजगाराच्या संधी आणि विविध क्षेत्रांतील मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन युवकांना सक्षम करण्यावर या उपक्रमाचा भर आहे.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांच्यासह खासदार पार्थ पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शिवाजीराव गर्जे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती