सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिक-रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; महाजनांकडे नाशिकची धुरा, गोगावलेंची रायगडवर नियुक्ती
  • 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
 जिल्हा

नवले पुलाजवळ मोबाईल हिसकावून पळणारा आरोपी जेरबंद; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

डिजिटल पुणे    17-08-2026 16:58:48

पुणे : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात मोबाईल हिसकावून चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केले. आरोपीकडून चोरीचा मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास नवले ब्रिज परिसरात फिर्यादी हे रिक्षाने जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग करून संधी साधत त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत आरोपी अभय गणपत वाघले, वय २५ वर्षे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोबाईल हिसकावून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडून चोरी केलेला मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन मोरे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.


 Give Feedback



 जाहिराती