सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर; ‘प्रेरणास्थळा’चे करणार उद्घाटन, शरद पवार यांनी दिली माहिती
  • मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
  • मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
  • विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
 शहर

हडपसरमध्ये पोलिसांच्या तत्परतेने हरवलेली बॅग मालकास परत

डिजिटल पुणे    18-08-2026 11:07:35

पुणे : हडपसर येथे रिक्षात विसरलेली मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असलेली बॅग पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही वेळातच संबंधित कुटुंबाला परत मिळाली.दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्धन गणपत भागवत हे चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या कॉलवर जात असताना हडपसर वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ थांबले होते. त्यावेळी एक व्यक्ती, त्यांची पत्नी आणि दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत बॅग हरवल्याचे सांगत पोलिसांकडे आले.

सदर कुटुंब सुरक्षा नगर, हडपसर येथील रहिवासी असून आंबेजोगाईकडे जाण्यासाठी रिक्षाने हडपसर मेन रोडवर आले होते. घाईगडबडीत त्यांची बॅग रिक्षातच राहून गेली होती. बॅगेत मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे आणि काही रोख रक्कम होती.

भागवत यांनी तत्काळ बॅगेतील मोबाईल क्रमांकावर फोन करून रिक्षाचालकाचा शोध घेतला. काही वेळाने रिक्षाचालकाने फोन उचलल्यानंतर त्याला बॅग रिक्षात राहिल्याची माहिती देण्यात आली. रिक्षाचालकाने सुमारे १५ मिनिटांत बॅग पोलिसांकडे आणून दिली.

बॅगेतील सर्व साहित्य जसेच्या तसे असल्याची खात्री करून ते संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्याचे मनःपूर्वक आभार मानत त्याला बक्षीस म्हणून १०० रुपये देण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.


 Give Feedback



 जाहिराती