पुणे : पुणे शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्यात आणि व्यायामात सातत्य राखण्याच्या उद्देशाने, पुणेकर ब्रँड ‘स्टॅमव्हिया’ने (STAMVIA) बाणेर येथील ॲम्ब्रोसिया गॅलक्सी (Ambrosia Galaxy) येथे आपल्या अत्याधुनिक फ्लॅगशिप फिटनेस सेंटरचा भव्य शुभारंभ केला आहे. या शुभारंभासोबतच, ब्रँडने पश्चिम पुण्यात आपला विस्तार वेगाने करण्यासाठी दोन प्रमुख फ्रँचायझी भागीदारांशी करार केले आहेत.
व्यायामाची सुरुवात उत्साहाने झाल्यानंतरही अनेकदा त्यात सातत्य राहत नाही, ही अडचण ओळखून स्टॅमव्हियाने व्यायाम, पोषण (न्यूट्रिशन) आणि शरीराची पुनर्प्राप्ती (रिकव्हरी) या सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. हा ब्रँड ‘ॲसेस, स्ट्रेंथेन, ट्रान्सफॉर्म आणि सस्टेन’ (Assess, Strengthen, Transform, Sustain) या चार टप्प्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीवर काम करतो.
बाणेर येथील या भव्य सेंटरमध्ये सदस्यांच्या आवडीनुसार विविध पर्याय उपलब्ध आहेत. स्ट्रेंथ, कार्डिओ आणि फंक्शनल ट्रेनिंगसाठी ‘स्टॅमव्हिया जिम’, तर योग, मॅट पिलेट्स आणि ‘बीटफिट’ या डान्स-बेस्ड वर्कआउटसाठी ‘स्टॅमव्हिया स्टुडिओ’ची सोय करण्यात आली आहे. याशिवाय, वर्कआउट नंतर पौष्टिक शाकाहारी व मांसाहारी आहारासाठी सेंटरमध्ये ‘न्यूट्रि-कॅफे’ (Nutri-Café) उपलब्ध असून, स्नायूंच्या आरामासाठी फिजियोथेरपी आणि स्टीम रिकव्हरी सुविधा पुरवली जाते.
या उपक्रमाविषयी बोलताना स्टॅमव्हियाचे सह-संस्थापक आणि गुंतवणूकदार विशाल पवार म्हणाले, "अनेक जण मोठ्या उत्साहाने व्यायाम सुरू करतात, पण त्यात सातत्य राखणे हेच सर्वात मोठे आव्हान असते. हा प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हावा यासाठीच आम्ही स्टॅमव्हियाची निर्मिती केली, जिथे व्यायाम, आहार आणि रिकव्हरी एकत्र मिळतात."
विशाल पवार, कुणाल केळकर आणि सागर गोडामगावे पाटील यांनी या ब्रँडची स्थापना केली आहे. ‘स्टॅमिना’ (Stamina) आणि ‘व्हिया’ (Via - मार्ग) या शब्दांच्या संयोगातून ‘स्टॅमव्हिया’ हे नाव साकारले असून, बाणेरमधील फ्लॅगशिप सेंटरनंतर आता पश्चिम पुण्यातील इतर महत्त्वाच्या भागांमध्येही ब्रँडचा फ्रँचायझीच्या माध्यमातून विस्तार केला जाणार आहे.