सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 क्राईम

साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची उरणमध्ये निघृण हत्या ;पलंगावरून पडल्याचा रचला बनाव; शवविच्छेदन अहवालानंतर नराधम सावत्र पित्याचं बिंग फुटलं

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    19-08-2026 11:11:14

उरण : उरण मध्ये लहान बालकाची हत्त्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय... अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडयाच्या या निष्पाप हट्टाचा संताप अनावर होऊन एका क्रूर सावत्र पित्याने त्याची अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधील फणसवाडी (मोरा) येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर मुलगा खेळताना पलंगावरुन पडून जखमी झाल्याचा बनाव रचून गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचाही सावत्र पित्याचा डाव होता; मात्र मोरा सागरी पोलिसांच्या सतर्कतेने आणि शवविच्छेदन अहवालाने या हत्येचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

या घटनेतील मृत बालक मोक्ष (३ वर्षे ५ महिने) हा त्याची आई काव्या आणि तिचा दुसरा पती जितेंद्र प्रदीप भिसे (२८) यांच्यासह उरण-मोरा येथील फणसवाडी येथे राहत होता. मोक्ष हा जितेंद्र भिसे याचा सावत्र मुलगा असल्याने त्याला सतत किरकोळ कारणांवरुन मारहाण करुन त्याचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारी घरात मोक्ष आणि जितेंद्र दोघेच होते. यावेळी मोक्षने आरोपी जितेंद्र याला तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांजवळ जायचं आहे, असा हट्ट धरला.

या निष्पाप शब्दांचा भयंकर राग आल्याने आरोपी जितेंद्रचे मानसिक संतुलन सुटले. त्यामुळे त्याने चिमुकल्या मोक्षचे डोके थेट भिंतीवर आपटले आणि लाकडी काठीने त्याच्या पायांवर बेदम मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता, त्याने मोक्षला सोफ्यावर पाडून त्याच्या छातीवरजोरात ठोसा (पंच) मारला. या जबर मारहाणीत मोक्षच्या बरगड्या तुटल्याने आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

अपघाताचा बनाव आणि

अंत्यसंस्काराची घाई:- 

मोक्षचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी जितेंद्रने दुपारी मुलगा घरात खेळताना अचानक पलंगावरुन खाली पडला व बेशुद्ध झाला, असा बनाव रचला. त्यानंतर मोक्षला तातडीने उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी ४ वाजता मोक्षला तपासून मृत घोषित केले. मुलगा मृत पावल्याचे स्पष्ट होताच आरोपी जितेंद्रने पोलिसांना न कळवता व शवविच्छेदन न करता बालकावर परस्पर अंत्यसंस्कार उरकण्याची घाई सुरु केली.

पोलिसांची सतर्कता आणि शवविच्छेदनाने उघड केली क्रूरता:- 

या संशयास्पद हालचालींची

माहिती मिळताच मोरा सागरी पोलिसांचे पथक फणसवाडी येथे दाखल झाले. पोलिसांना पालकांच्या भूमिकेवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल केला. दिनांक १५ ऑगस्ट रोजी रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या ऍडव्हान्स डेथ सर्टिफिकेटमध्ये मोक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत, बरगडया फॅक्चर आणि जबर मारहाणीमुळे झालेला हत्येचा मृत्यू, असे डॉक्टरांनी धक्कादायक निष्कर्ष नोंदवले. वैद्यकीय अहवाल समोर येताच पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी जितेंद्रने हत्येची कबुली दिली.

दरम्यान, आरोपीने मुलाच्या हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक तपासामुळे सत्य समोर आले. त्यानुसार आरोपी जितेंद्र प्रदीप भिसे याला हत्या आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कटवाणी यांनी दिली. न्यायालयाने आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचेही त्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती