सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 जिल्हा

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

डिजिटल पुणे    19-08-2026 14:51:39

मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. जिजाऊंच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिंदखेडराजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी २०२४ साली  ५० कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. या निधीमधून सिंदखेडराजा जवळील जिजाऊसृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते. आजवर या कामांसाठी २७ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून, हे काम सध्या प्रगतीपथावर आहे.  मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष स्मारकाच्या कामालाही सुरुवात करता यावी यासाठी अजून ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निधीतून जिजाऊ माँसाहेबांच्या स्मारक  तसेच या परिसरातील रस्ते आणि आजूबाजूच्या इतर सोयी सुविधांचा विकास केला जाईल. स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागवून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात येणार असून, लवकरात लवकर या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर,  आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शशिकांत खेडेकर हेदेखील उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती