सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 शहर

विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा मृत्यू; आई सुदैवाने बचावली, भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

डिजिटल पुणे    19-08-2026 17:28:57

पुणे : दौंड तालुक्यातील राहू गावाजवळील सोनवणेमळा येथे घरातील विद्युत काम सुरू असताना विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ओम भोईटे आणि रोहित भोईटे अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अनिल भोईटे यांच्या घरी सकाळच्या सुमारास वीजेचे काम सुरू होते. यावेळी ओम भोईटे यांना अचानक विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला. ही बाब लक्षात येताच त्यांचा चुलत भाऊ रोहित मदतीसाठी धावून गेला. मात्र, ओम यांना वाचवण्याच्या प्रयत्नात रोहितलाही विजेचा धक्का बसला.

दोघांना विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांच्या आईनेही मदतीसाठी धाव घेतली. मात्र, सुदैवाने त्या या दुर्घटनेतून बचावल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी ओम आणि रोहित यांना तातडीने यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

पावसाळ्यात विद्युत यंत्रणा, वायर आणि घरगुती वीजकाम करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज असते. या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून भोईटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 Give Feedback



 जाहिराती