सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 जिल्हा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला विविध विभागांच्या योजनांचा आढावा

डिजिटल पुणे    20-08-2026 11:48:19

नांदेड : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नांदेड दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या योजना व कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या घरकुल योजनेसह समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे काम, ॲट्रॉसिटी प्रकरणातील पीडितांना मदत तसेच दिव्यांग विभागामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली.

देगलूर येथे दिव्यांग विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना यासह विविध विषयांचा आढावा घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

बैठकीस उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य डॉ. छाया कुलाल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजेश एडके, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक तेलंग, लीड बँकेचे व्यवस्थापक सोनकांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती