सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 जिल्हा

बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

डिजिटल पुणे    20-08-2026 14:13:43

मुंबई  : पुणे जिल्हा परिषदेची निवासस्थाने बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या बिबवेवाडी येथील जागेवरील आरक्षण रद्द करणे आवश्यक आहे. हे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७(१) नुसार पुणे महानगरपालिकेने प्रक्रिया करून नगर विकास विभागाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.पुण्यातील बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या भूखंडांवरील आरक्षण रद्द करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील , नगरविकास विभागाच्या सहसचिव सुलेखा वैजापूरकर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती