सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 विश्लेषण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर अध्यक्षांचे पदग्रहण; 'पुणेकरांचा विश्वास जिंकू, पुणेकरांचा आवाज बुलंद करू' : नवनियुक्त शहराध्यक्षांचा निर्धार

डिजिटल पुणे    21-08-2026 10:38:01

पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर अध्यक्षांचे पदग्रहण कार्यक्रम आज पक्ष कार्यालयात उत्साहात पार पडला. श्रीकांत पाटील, विशाल तांबे यांनी माजी राज्यसभा सदस्य एड. वंदना चव्हाण, आमदार बापूसाहेब पठारे, प्रवक्ते अंकुश काकडे, रवीकांत वर्पे काका चव्हाण, पंडित कांबळे, डॉ सुनील जगताप, एड .औदुंबर खुने पाटील, स्वाती पोकळे,मनाली भिलारे, श्रद्धा जाधव , रवी चौधरी , शशिकांत तापकीर यांच्या उपस्थितीत पदाची सूत्रे स्वीकारली.

नऊ एफ एस आय ची खिरापत धोकादायक: एड वंदना चव्हाण

यावेळी बोलताना एड. वंदना चव्हाण म्हणाल्या,' पक्षाचे दोन्ही नूतन शहर अध्यक्ष झपाट्याने वाढ होत असलेल्या पुणे शहरात पक्ष संघटना वाढवतील. मरगळ झटकून टाकतील, असा विश्वास आहे. हा पक्ष विचार मांडणारा पक्ष आहे, पक्षाचा विचार सर्वत्र वाढवला पाहिजे. सर्वांनी जिद्दीने कार्यरत राहिले पाहिजे. शहराला भेडसावणारे प्रश्न मांडले पाहिजे, लढले पाहिजे. शरद पवार यांचा पक्ष म्हणून वेगळा ठसा उमटविला पाहिजे.

पुणे शहरात एकाचा दोन एफ एस आय होणे समजू शकतो पण, दोनचा चार आणि पुढे नऊ होणे धोकादायक आहे.  एफ एस आय वाढेल त्याप्रमाणात रस्ते आणि पायाभूत सुविधा वाढणार नाहीत. पालिकेत भाजपचा दामटून कारभार सुरु आहे. त्या विरोधात अभ्यासपूर्ण आवाज उठवला पाहिजे. शहरीकरणाच्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर महिला, युवा अशा समाज गटांच्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे

बापूसाहेब पठारे म्हणाले, भावी काळात पुण्यात दोन लोकसभा मतदार संघ होण्याची शक्यताही आहे. त्यानुसार संघटन मजबूत केले पाहिजे. पक्षाच्या अन्य आघाड्या विस्तारल्या पाहिजेत.श्रीकांत पाटील म्हणाले, 'संघटना आणि पक्षाची प्रतिमा वृद्धिंगत केली पाहिजे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात काम वाढवू. सर्वत्र बीएलए प्रतिनिधी देण्यात यश मिळाले आहे.कार्यकर्त्यांच्या घरी जावून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहे, ते प्रयत्न वाढवू.

 विशाल तांबे म्हणाले,' शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असताना पुणेकरांचा विश्वास जिंकू, पुणेकरांचा आवाज बुलंद करू. पक्ष नेतृत्वाला अपेक्षित काम करून दाखवू. कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवू.सर्वांची साथ घेऊन पुढे जावू.विलीनीकरण संदर्भात जे काही झाले त्यावर पुन्हा पुन्हा बोलून उपयोग होणार नाही. तो आता भूतकाळ झाला असून भविष्यासाठी कार्यरत झाले पाहिजे. मतदार यादीत संख्या कमी होणे ही धोक्याची घंटा आहे, त्यावर काम करावे लागेल. नव्या पिढीला आजही शरद पवार यांचे नेतृत्व आपलेसे वाटते, त्यामुळे पक्षाचे भविष्य उज्वल आहे.काका चव्हाण म्हणाले, पक्षाच्या सर्व आघाड्या मजबुत करणे आणि एस आय आर प्रक्रियेत काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. पक्षाचा मतदार जोडून ठेवणे आवश्यक आहे.

सामाजिक संघटना;जेन झी यांना सोबत घेवून पु ढं जाऊया; असे आवाहन पंडित कांबळे यांनी केले.डॉ सुनील जगताप यांनी पुण्याच्या विस्तारात पक्षाचे योगदान वाढवण्यासाठी दोन शहराध्यक्ष नियुक्तीचा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.श्रद्धा जाधव यांनी आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शहराध्यक्ष विशाल विलासराव तांबे हेराष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून २००७ पासुन नगरसेवक होते. २०१३-१४ मध्ये त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही सांभाळले आहे.पीएमआरडीएचे नियोजन समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणुक समन्वयक व निवडणूक पक्ष प्रवक्ते म्हणूनही तांबे यांनी काम पाहिले आहे. श्रीकांत पाटील यांना समाजकारण, शिक्षण, राजकीय क्षेत्राचा वारसा आहे. गणेश मंडळापासून नगरसेवक पदावर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.


 Give Feedback



 जाहिराती