सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 शहर

*परंपरा २०२६ मधील विद्यार्थ्यांची सृजनशीलता कौतुकास्पदः उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार*

डिजिटल पुणे    24-08-2026 17:19:02

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम अंतर्गत चालणाऱ्या फॅशन टेक्नालॅाजी विभागातर्फे आयोजित ‘परंपरा २०२६’ फॅशन व टेक्सटाईल प्रदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी आपले ज्ञान, कौशल्य, कल्पकता व सृजनशीलता दाखवणारे हक्काचे व्यासपीठ आहे. या कार्यक्रमाद्वारे फॅशन टेक्नालॅाजी विभागाने परंपरा व आधुनिकता यांची उत्कृष्ट संगम घडवून आणला असून काळानुरूप जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक नवनवीन कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी यशाची नवे शिखरे गाठावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मा. सुनेत्राताई पवार यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नालॅाजी विभागातर्फे पुणे महानगरपालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘परंपरा २०२६’ या फॅशन व टेक्सटाईल प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानद सचिव ॲड. संदीपजी कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप, विभाग प्रमुख प्रा. प्रीती जोशी आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये फॅशन टेक्नालॅाजी विभागातील विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरा, शाश्वत फॅशन, अपसायकलिंग, वस्त्रकला, फॅशन इलस्ट्रेशन, गारमेंट कन्स्ट्रक्शन तसेच इतर नाविन्यपूर्ण डिझाईन संकल्पनांवर आधारित उत्कृष्ट प्रकल्प सादर केले. सदर प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप दिली. कार्यक्रमाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी प्रा. फातिमा सय्यद, प्रा. वीणा कारंडे, प्रा. श्वेता परदेशी, प्रा. जान्हवी बडगुजर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती