सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 जिल्हा

बुरुड समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मंत्री संजय शिरसाट

डिजिटल पुणे    25-08-2026 13:05:02

मुंबई : बुरुड समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक असून कार्यवाही करण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.बुरुड समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने विविध मागण्यांबाबत मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव अशोक आत्राम, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रविंद्र गोरवे, सतीश खैरमोडे, ग्रामविकास विभागाच्या अवर सचिव संगीता लांडे, तसेच अमोल वडतीले महसूल व नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बुरुड समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन मंत्री श्री. शिरसाट यांना सादर करण्यात आले. समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करणे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ५० कोटी रुपयांचे विकास पॅकेज उपलब्ध करून देणे, तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायतींच्या बाजारपेठांमध्ये व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून देणे, या प्रमुख मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पात्र बुरुड समाजातील कुटुंबांना विनाअट दारिद्रय रेषे खालील (बीपीएल) रेशनकार्डचा लाभ देणे, भूमिहीन कुटुंबांना शासकीय मालकीची जमीन उपलब्ध करून देऊन त्यांना भूमिधारक करण्याबाबत कार्यवाही करणे, तसेच समाजातील महिलांना कुक्कुटपालन, शेळीपालन व मेंढीपालन यांसारख्या व्यवसायांसाठी आवश्यक अनुदान व विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.

वन विभागाशी संबंधित मागण्यांवर स्वतंत्र बैठक

बुरुड समाजाच्या मागण्यांमध्ये वन विभागाशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यासाठी वन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक आयोजित करावी, असे निर्देश मंत्री श्री. शिरसाट यांनी दिले. संबंधित विभागांनी आपल्या अखत्यारितील प्रलंबित मागण्यांवर विभागनिहाय कार्यवाही करून त्याचा नियमित पाठपुरावा करावा, तसेच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.बुरुड समाजाच्या मागण्यांबाबत संबंधित विभागांनी सकारात्मक दृष्टिकोनातून कार्यवाही करून आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. समाजाच्या विकासाशी संबंधित प्रश्नांचा समन्वयाने निपटारा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी दिले.


 Give Feedback



 जाहिराती