सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 क्राईम

नांदेडसिटी पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून दोन गावठी पिस्तूल जप्त

डिजिटल पुणे    26-08-2026 15:15:25

पुणे : नांदेडसिटी पोलीस स्टेशनच्या पथकाने विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध कारवाई करत दोन गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. या कारवाईत एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांना २४ ऑगस्ट २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, खडकवासला येथील लांडगे वस्ती परिसरात राहणारा मारुती ऊर्फ मारी बाळू चव्हाण हा यशवंत विद्यालयाजवळील कॅनॉल परिसरात येणार असून त्याच्याकडे हत्यार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नांदेडसिटी पोलिसांनी यशवंत विद्यालयाजवळील कॅनॉल परिसरात सापळा रचून मारुती ऊर्फ मारी बाळू चव्हाण (वय २६, रा. लांडगे वस्ती, खडकवासला, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे, दत्तात्रय सावंत तसेच पोलीस अंमलदार शुभम चव्हाण, प्रतिक ऊर्फ बंटी मोरे, मनोहर खराडे, भिमराज गांगुर्डे, मोहन मिसाळ, शिवाजी क्षीरसागर, संग्राम शिनगारे, सतीश खोत, राजू वेगरे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, निलेश खांबे, उत्तम शिंदे आणि अक्षय जाधव यांचा सहभाग होता.


 Give Feedback



 जाहिराती