सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 क्राईम

श्रावणात मटणाची मागणी ठरली जीवघेणी; वडिलांच्या मारहाणीत ३० वर्षीय मुलाचा मृत्यू, आई-वडील अटकेत

डिजिटल पुणे    27-08-2026 14:42:26

पुणे : श्रावण महिन्यात दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने मटणाचे कालवण बनवून देण्याचा हट्ट धरला. यावरून वडील आणि मुलामध्ये झालेला वाद विकोपाला गेला आणि वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडीतील रामनगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महेश भागवत गायकवाड (वय ३०) याला दारूचे व्यसन होते. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, व्यसन आणि कामधंदा नसल्यामुळे पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली होती. घटस्फोटानंतर महेश एकटाच राहत होता आणि जेवणासाठी तो आई-वडिलांकडे जात होता.

मटणाच्या मागणीवरून वाद

२४ ऑगस्ट रोजी रात्री महेश दारू पिऊन घरी आला. त्याने जेवणासाठी मटणाचे कालवण करण्याची मागणी केली. मात्र, श्रावण महिन्यामुळे घरात मांसाहार केला जात नसल्याचे त्याला सांगण्यात आले. यावरून महेश आणि त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) यांच्यात जोरदार वाद झाला.वाद वाढल्यानंतर भागवत यांनी महेशच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले. या मारहाणीत महेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

आईवरही पुरावे नष्ट केल्याचा आरोप

मुलाचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची माहिती असतानाही आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांनी घटनेची माहिती इतरांना दिली नसल्याचा आरोप आहे. तसेच, पतीला वाचवण्यासाठी घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी महेशच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भागवत गायकवाड आणि पार्वती गायकवाड या दोघांना अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती