सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 जिल्हा

कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा; १४ जण रुग्णालयात दाखल

डिजिटल पुणे    27-08-2026 15:58:01

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यानंतर तब्बल १६ जणांना अन्नविषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मोमोज खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. एकाच वेळी अनेकांची प्रकृती बिघडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रकृती खालावलेल्या सर्वांना तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दोन जणांवर बाह्यरुग्ण विभागात प्राथमक उपचार करण्यात आले. दाखल रुग्णांमध्ये ३ ते १४ वर्षे वयोगटातील काही मुलांचाही समावेश आहे.

उलट्या-जुलाबासह ताप आणि पोटदुखीचा त्रास

मोमोजचे सेवन केल्यानंतर काही वेळातच बाधित नागरिकांमध्ये उलट्या आणि जुलाबाची लक्षणे दिसून आली. काहींना ताप, तीव्र पोटदुखी तसेच चक्कर येण्याचा त्रास झाला. एकापाठोपाठ १६ जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

१४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १४ रुग्णांमध्ये लहान मुलांसह प्रौढांचाही समावेश आहे. तर दोन जणांवर ओपीडीमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार आवश्यक उपचार करण्यात आले आहेत.

आरोग्य समिती अध्यक्षांकडून रुग्णांची विचारपूस

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी भाभा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णांची विचारपूस करत डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून बाधितांची प्रकृती तसेच सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर

रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मोमोजमुळे नेमकी अन्नविषबाधा कशामुळे झाली, याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती