सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 क्राईम

रस्ता चुकली अन् स्लीपर बसमध्ये बसली; 47 किमीच्या प्रवासात 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, चालक-क्लिनरला अटक

डिजिटल पुणे    31-08-2026 14:49:36

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये चालक आणि क्लिनरने सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 4 ऑगस्टच्या रात्री कश्मीरी गेट परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी बस चालक कुलदीप आणि क्लिनर संदीप यांना अटक केली असून, घटनेत वापरलेली बसही ताब्यात घेण्यात आली आहे.

पावसामुळे रस्ता चुकला, अनोळखी बसमध्ये बसली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कुटुंबीयांवर नाराज होऊन कोणालाही न सांगता घरातून निघाली होती. ती नोएडामध्ये राहणाऱ्या चुलत भावाकडे जात होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती ग्रेटर नोएडातील परी चौक येथे उतरली.याचदरम्यान तेथून एक रिकामी स्लीपर बस जात होती. मुलीने बस थांबवण्यासाठी हात केला. चालक आणि क्लिनरने बस थांबवत तिला नोएडा सेक्टर-63 येथे जाणार असल्याचे सांगितले आणि तिला बसमध्ये घेतले.

बस सुरू होताच गैरवर्तनाचा आरोप

बस पुढे निघाल्यानंतर काही वेळातच क्लिनरने मुलीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, त्यानंतर चालक आणि क्लिनरने तिच्यावर अत्याचार केला. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.आरोपींनी रात्री उशिरा कश्मीरी गेट बस अड्ड्याजवळील रिंग रोड परिसरात मुलीला बसमधून खाली उतरवले आणि तेथून फरार झाले.

परी चौक ते कश्मीरी गेट; 47 किमीच्या प्रवासात अत्याचाराचा आरोप

परी चौक ते कश्मीरी गेट हा सुमारे 47 किलोमीटरचा प्रवास असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रवासादरम्यान मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. बसमधून खाली उतरल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत तिने कश्मीरी गेट पोलिसांशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला.माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि तिमारपूर परिसरातील बस पार्किंगमधून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

बस ताब्यात; फॉरेन्सिक तपास सुरू

पोलिसांनी घटनेत वापरलेली स्लीपर बस ताब्यात घेतली असून, तिची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये बिघाड झाल्यानंतर ती दुरुस्तीसाठी सूरजपूर येथील वर्कशॉपमध्ये नेण्यात आली होती. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर चालक आणि क्लिनर रिकामी बस घेऊन तिमारपूरच्या दिशेने निघाले होते.या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलीस करत असून, पीडितेच्या जबाबासह फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती