पुणे: मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कर्वेनगर,पुणे येथील इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातर्फे आयोजित 'वारीथॉन- २०२६' या राष्ट्रीय हॅकाथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला.उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित पटाईत आणि पराग कापरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. सचिन साखरे, उपप्राचार्या प्रा. स्वाती देशमुख, सौ.अदिती गणगे ,ई अँड टीसी विभागप्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. अंजली भातलवंडे, तसेच विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि सहभागी उपस्थित होते. २४ तासांच्या या हॅकाथॉनची सांगता प्रमुख पाहुणे राहुल प्रकाश दिघे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी चारही विषयांतील एकूण १२ विजेत्या संघांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव करण्यात आला . एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
८०० वर्षांच्या समृद्ध वारी परंपरेपासून प्रेरणा घेत या उपक्रमाचे दि. २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले.हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी अनुभव, गर्दी व वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य व सुरक्षितता आणि मुक्त नवकल्पना या विषयांवर तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण उपाय विकसित केले गेले.समारोप समारंभात डॉ. अंजली भातलवंडे यांनी वारीथॉन -२०२६ ची संकल्पना, उद्दिष्टे आणि संपूर्ण प्रवास याबाबत उपक्रमाची भूमिका अधोरेखित केली.