सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
  • मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
  • स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
  • पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा
 DIGITAL PUNE NEWS

भर कार्यक्रमात पूजा- सोहमची अचानक एन्ट्री; आदेश बांदेकर झाले भावुक, डोळ्यांत तरळले अश्रू

डिजिटल पुणे    01-09-2026 16:57:35

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम *‘होम मिनिस्टर’*मधून घराघरांत पोहोचलेले आदेश बांदेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ‘दार उघड बये दार उघड’ ही आदेश भावोजींची हाक पुन्हा ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान मात्र आदेश बांदेकरांना मिळालेल्या एका खास सरप्राईजने संपूर्ण वातावरण भावुक झालं.

पूजा आणि सोहमची अचानक एन्ट्री

‘होम मिनिस्टर’च्या शूटिंगमध्ये आदेश बांदेकर कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांच्यासमोर अचानक मुलगा सोहम बांदेकर आणि सून पूजा बिरारी पोहोचले. अचानक समोर आलेल्या दोघांना पाहून आदेश बांदेकरांना सुखद धक्का बसला.

पूजाने आदेश बांदेकरांची भेट घेताच त्यांनी तिला लेकीप्रमाणे जवळ घेतलं. त्यानंतर पूजा आणि सोहम यांनी आदेश बांदेकरांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. हा संपूर्ण प्रसंग पाहून उपस्थितांच्याही भावना दाटून आल्या.

आदेश भावोजींच्या डोळ्यांत तरळले अश्रू

मुलगा आणि सुनेची अचानक झालेली भेट पाहून आदेश बांदेकर भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू तरळले. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या भावनिक क्षणानंतर आदेश बांदेकर म्हणताना दिसतात, “माऊली, तुमच्या प्रश्नाचं उत्तर... डोळ्यातून पाणी कसं आलं...” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे या भेटीमागील भावनिक नातं आणखी अधोरेखित झालं.

पूजासोबतचं नातं आहे खास

आदेश बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्यातील खास बॉण्ड यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे. आदेश बांदेकर यांनी एका मुलाखतीत पूजाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं होतं. पूजा ही केवळ घरची सून नसून मुलगीच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

“सासरा कमी, बाबा जास्त झालोय”

पूजाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले होते की, “मी सासरा कमी आणि बाबा जास्त झालो आहे. घरात मुलगी येण्याचा आनंद किती वेगळा असतो, हे आता नव्याने अनुभवतोय.”तसंच, त्यांच्या घरी सुचित्रा आली तेव्हाही अशीच भावना होती आणि आता पुन्हा तोच अनुभव मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. “प्रत्येक घरात मुलगी असावी, कारण ती घरातील नात्यांना नवा अर्थ देते. पूजा ही माझी लाडाची मुलगी आहे,” असंही त्यांनी म्हटलं होतं.आदेश बांदेकर, सोहम आणि पूजा यांच्या या खास भेटीचा व्हिडीओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असून, सासरा-सुनेपेक्षा वडील-मुलीचं नातं अधिक घट्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती