सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरे गटाच्या जोरदार युक्तिवादानंतर आज शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार; धनुष्यबाण चिन्हाचा वाद निर्णायक टप्प्यावर
  • : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे
 शहर

संस्थाही आपलीच कर्मभूमी म्हणून काम केल्यास नक्कीच प्रगती होते ,--- शैलेंद्रजी जगताप यांचे प्रतिपादन

गजानन मेनकुदळे    02-09-2026 15:09:42

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ  लिमिटेड मधून 32 वर्षाची विना अपघात सेवा पूर्ण करून स्वारगेट येथे चालक या पदावर काम करत असलेले श्री दत्तात्रेय मोडक आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा  सेवा निवृत्ती सन्मान सोहळा कार्यक्रम ग्रँड  पुरंदर बॅक्वेट हॉल भिवरी  येथे नटराज बस स्थानक  सर्व कर्मचारी यांच्या मार्फत  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष स्वारगेट आगार व्यवस्थापक   शैलेंद्र जगताप साहेब यांच्या हस्ते मोडक यांचा पुणेरी पगडी, शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह, देऊन सन्मान करण्यात आला 

 याच कार्यक्रमात  स्वारगेट आगारात कार्यरत असलेले वाहक तानाजी कांबळे यांना  शिव-भिम राज्यस्तरीय  समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा कामगारांमार्फत  जगताप साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी कामगारांना  मार्गदर्शन करत असताना कोणत्याही संस्थेत काम करत असताना संस्था आपली कर्मभूमी म्हणून सर्वांनी एकजुटीने काम केल्यास संस्थेचा नावलौकिक वाढवून आपली प्रगती होत असते संस्थेची भरभराटी हाच आपला विकास असतो व त्यातून जनतेला सुरक्षित अशी सेवा मिळत असते एकत्रितपणे काम केल्यास यश नक्कीच मिळते कार्यक्रमाचे प्रास्ताविक  तानाजी कांबळे यांनी केले सूत्रसंचालन सागर कांबळे , आभार  बाळासाहेब  पायगुडे  यांनी मानले या कार्यक्रमासाठी  सर्व चालक वाहक अधिकारी,इतर  कर्मचारी, निवृत्त कामगार ,  नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते


 Give Feedback



 जाहिराती