पुणे : ध्वनि प्रदूषणाच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या भ्याड कृत्याचा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या एससी एसटी आघाडीने तीव्र निषेध केला आहे.आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय आल्हाट तसेच पदाधिकारी प्रमोद राजगुरू, दत्तात्रय राजगुरू,विजय आटवल,विजय कदम आणि के. सी. पवार यांनी याबाबत संयुक्त पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे."लोकशाहीत विचारांना उत्तर विचारांनी द्यायचे असते, गुंडगिरीने नाही. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात अशा घटना घडणे हे निषेधार्ह आहे," असे मत संजय आल्हाट यांनी व्यक्त केले.या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी आणि बापट यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी आघाडीने केली आहे.जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघानेही निषेध केला आहे.