सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा डबल साऊंड लावल्याने मंडळावर कारवाई; साऊंड सिस्टिमही जप्त
  • दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, जुन्या सांगवीतील खळबळजनक घटना
 शहर

डिजिटल सुरक्षेचा जागर; वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती

डिजिटल पुणे    05-09-2026 18:52:01

पुणे : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेता, Quick Heal Foundation यांच्या ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या उपक्रमांतर्गत वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. MKSSS K. B. Joshi Institute of Information Technology येथील विद्यार्थिनी साक्षी पाटील आणि पलक छाजेड यांनी उपस्थितांशी संवाद साधत हे मार्गदर्शनपर सत्र घेतले.

या सत्रामध्ये फिशिंग, OTP फसवणूक, बनावट लिंक व प्रोफाइल, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षितता, मजबूत पासवर्ड आणि Two-Factor Authentication (2FA) यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

दैनंदिन डिजिटल वापराशी संबंधित Instagram, WhatsApp, UPI, ऑनलाइन शॉपिंग आणि सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांची उदाहरणे देत सायबर धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या. तसेच संशयास्पद लिंक व संदेश ओळखणे, OTP आणि वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवणे, सुरक्षित पासवर्डचा वापर करणे आणि सोशल मीडिया अकाउंट अधिक सुरक्षित ठेवणे याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

सत्रादरम्यान उपस्थितांचा सक्रिय सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून प्रत्येक डिजिटल वापरकर्त्याची जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.या उपक्रमासाठी MKSSS K. B. Joshi Institute of Information Technology च्या प्राचार्या अनघा वैद्य, HOD रुपाली सराफ आणि समन्वयक मनाली सपकाळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


 Give Feedback



 जाहिराती