सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा डबल साऊंड लावल्याने मंडळावर कारवाई; साऊंड सिस्टिमही जप्त
  • दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, जुन्या सांगवीतील खळबळजनक घटना
 शहर

कर्णकर्कश लाऊडस्पीकरविरोधात पुणेकर मोठ्या संख्येने मोर्चात सामील;आता डीजे, स्पीकरबंदीशिवाय माघार नाही :पुणेकरांचा निर्धार

डिजिटल पुणे    07-09-2026 10:57:45

पुणे : लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत पुणेकर मोठ्या संख्येने आज मोर्चामध्ये सामील झाले. बालगंधर्व चौकामध्ये मोर्चाच्या वेळेच्या अगोदरच नागरिक जमा होण्यास सुरुवात झाली होती. तिथून पुणे महानगरपालिका इथपर्यंत मोर्चा काढण्यात आला. नागरिक मोठ्या प्रमाणावर प्लाकार्ड व बॅनर बनवून घेऊन आले होते. जेनजीच्या आंदोलनाप्रमाणेच आज आंदोलनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रौढ पुणेकरांचा रोष या आंदोलनात पहावयास मिळाला. सर्व धार्मिक,राजकीय,जातीय महापुरुषांच्या कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश्य स्पीकरवर बंदी आणावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.आवाज बंद कर डीजे,तुला पुणेकरांची शपथ हाय तसेच डीजे बंदीच्या घोषणा या आंदोलनात पुणेकर देत होते. 

मोर्चामध्ये शेवटी पुण्याचे पोलीस उपायुक्त रावले, सह आयुक्त अनुजा देशमाने यांना आंदोलनाचा तर्फे मुकुंद किर्दत यांनी निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने उत्सवाअगोदरच कार्यक्रमापूर्वी या डीजेला प्रतिबंध करावा, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची नावे फोन नंबर जाहीर करण्यात यावेत, रियल टाईम डेटा रोज वेबसाईटवर टाकण्यात यावा, त्याची कारवाई संदर्भातील माहिती प्रसिद्ध करावी तसेच शारीरिक मानसिक नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. केवळ गणेश उत्सव नाही तर इतर सर्वच पद्धतीच्या धार्मिक जातीय राजकीय नेमणुका मध्ये या करण्याकरता स्पीकरवर बंदी आणावी आणि जे नागपूर सोलापूरला आणि मुंबईला होऊ शकते ते पुण्यात का नाही असा सवाल यावेळी विचारण्यात आला. येत्या आठवड्यात याबाबत निर्णय न झाल्यास पुणे तर पुन्हा नाईलाजाने रस्त्यावर उतरतील असा इशाराही मुकुंद किर्दत यांनी दिला.

या बिगर राजकीय आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पुणेकरांसोबत संस्था संघटनेचे आणि राजकीय पक्षांचेही कार्यकर्ते आपला पक्षीय अभिनवेश बाजूला ठेवत सामील झाले होते. शेवटी सभेत ध्वनी प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व डॉक्टर राहुल सावंत यांनी आरोग्यविषयक धोके थोडक्यात सांगितले व मुकुंद किर्दत यांनी मागण्या मांडल्या. त्यानंतर राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता झाली.

कर्णकर्कश डिजेविरोधामध्ये आता पुणेकर मोठ्या प्रमाणामध्ये एकवटले असून ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’ या नावाने सोशल मीडियावर मोठा पुणेकरांचा ग्रुप तयार झाला असून सहभागाने हा मोर्चा काढण्यात आला त्या मध्ये आयोजनात मुकुंद किर्दत (फोन ७०३८८६६३३६) ॲड. कृणाल घारे, चिंतामणी कांगो, नीता केळकर, डॉ सिमी आठवले, डॉ राहुल सावंत, सुदर्शन जगदाळे, उमेश खंदारे, श्रीकांत भिसे, विक्रांत पाटील, अशोक मेहंदळे, आशिष गुंजाळ, कौस्तुभ खांडेकर, समीर बर्डे, मिलिंद केळकर, कीर्ती लिमये , विनोद पवार, तुषार कासार आदींनी सहभाग नोंदवला.

लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच PUNEKARS against LOUDspeakers


 Give Feedback



 जाहिराती