सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

ढोलपथक आणि इतर खर्च कमी करून भरली विद्यार्थ्यांची फी ! श्री गजानन मंडळ ट्रस्ट, तुळशीबागचा उपक्रम

डिजिटल पुणे    08-09-2026 11:34:36

पुणे : गणेशोत्सवातील पारंपरिक जल्लोषाला सामाजिक बांधिलकीची जोड देत श्री गजानन मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग यांनी यंदाच्या उत्सवाची सुरुवातच एका वेगळ्या संकल्पनेने केली आहे. ढोलपथक आणि इतर खर्च कमी करून त्या निधीतून नु.म.वि. प्रशालेतील ६ विद्यार्थ्यांचे वार्षिक शालेय शुल्क भरून मंडळाने ‘उत्सवातून समाजासाठी काहीतरी देण्याचा’ संदेश दिला आहे.मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शालेय शुल्क प्रदान करताना आमदार हेमंत रासने,राघवेंद्र मानकरसागर सुनील दहीभाते,कुणाल टिळक,प्रशांत यादव आदि मान्यवर उपस्थित होते.यंदा मंडळाचे ६१ वे  वर्ष असून यानिमित्ताने भव्य गणेशोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. विश्रामबागवाडयासमोरून तुळशीबागेत जाणाऱ्या गल्लीच्या प्रारंभीच हे मंडळ असून   भव्य  सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

उत्सवाची सुरुवातच सामाजिक उपक्रमाने करणाऱ्या मंडळाने पर्यावरण संवर्धनाचाही वेगळा मार्ग स्वीकारला आहे. परिसरातील व्यापाऱ्यांना प्लास्टिकच्या ग्लासातून चहा न पिण्याचा केवळ सल्ला न देता स्टीलचे ग्लास देण्यात आले. प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरण व आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे तुळशीबाग सारख्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही  येणार्‍या भाविकांना तसेच पारंपरिक व्यावसायिक यांना कोणताही त्रास ना होता मंडप उभारण्यात आला आहे .यंदा 'पुणे परिवार' कडून  मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांना  आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला

श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट तुळशीबागकडून ‘गिरीकंधरा’ हा भव्य  ४० फूट उंच देखावा सादर करण्यात येणार आहे. या देखाव्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते ११ फुटांचे ध्यानस्थ हनुमानाचे हवेत तरंगणारे रूप. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात येणारा हा अनुभव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.पर्वताच्या अंतरंगात प्रवेश केल्यानंतर अनुभवायला मिळणारे अद्भुत विश्व, रामायणकालीन प्रसंग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा मेळ या देखाव्यात साधण्यात आला आहे.यानिमित्ताने १ ते ५ वर्षे वयोगटातील पाच हजार बालभक्तांना ‘हनुमान अस्त्र’ म्हणून गदा वाटप करण्यात येणार आहे. हनुमानाच्या शौर्य, भक्ती आणि संस्कारांची ओळख बालमनाला व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.


 Give Feedback



 जाहिराती