सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

भुमकर चौक ते स्वामीनारायण मंदिर सेवा रस्त्यावर वाहतूक बदल; वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

डिजिटल पुणे    08-09-2026 12:14:46

पुणे : सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत भुमकर चौकाजवळील स्वामीनारायण मंदिर परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी भुमकर चौक ते स्वामीनारायण मंदिर दरम्यानच्या सेवा रस्त्यांवर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भुमकर चौक, सर्व्हिस रस्ता (सातारा लेन) ते स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या लेनवरील वाहनांना केवळ जाण्याकरिता एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

तसेच स्वामीनारायण मंदिराच्या मागील बाजूस जाणाऱ्या सेवा रस्त्यावरही एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या कनेक्टिंग पुलावरून भुमकर चौकाकडून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश राहणार आहे. मात्र, स्वामीनारायण मंदिराकडून भुमकर चौकाकडे येणाऱ्या वाहनांना या मार्गावरून प्रवेश करता येणार नाही.

या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनी मंदिराच्या डाव्या बाजूकडील सर्व्हिस रोडचा वापर करून भुमकर चौकाकडे यावे, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. या वाहतूक बदलामुळे परिसरातील वाहनांची वर्दळ नियंत्रित होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील वाहनचालकांनी नवीन वाहतूक व्यवस्थेची नोंद घेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

— पुणे शहर वाहतूक पोलीस, सिंहगड रोड वाहतूक विभाग


 Give Feedback



 जाहिराती