पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ,वृंदावन कथक नृत्यालय आयोजित ‘कृष्णार्पण’ हा कथक नृत्याविष्कार शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता,पुणे येथे सादर करण्यात येणार आहे. ‘कृष्णार्पण’ या कार्यक्रमातून विदुला बाळवेकर आणि त्यांच्या शिष्यांचा कथक नृत्याविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे आणि कथक नृत्यशैलीतील भाव,ताल,लय व अभिनयाचे सादरीकरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा ३०४ वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.