सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! प्रसाद-अन्नदानासाठी FDA नोंदणी बंधनकारक; १०० रुपयांत नोंदणीची सुविधा

डिजिटल पुणे    12-09-2026 13:43:36

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून वितरित करण्यात येणारा प्रसाद, महाप्रसाद आणि अन्नदान सुरक्षित व स्वच्छ राहावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार अन्नदान किंवा प्रसादवाटप करणाऱ्या गणेश मंडळांना FDA कडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या कालावधीत अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर FDAच्या विशेष पथकांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन अन्न तयार करण्याच्या ठिकाणची स्वच्छता तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.

१०० रुपयांत नोंदणीची सुविधा

अन्नदान करणाऱ्या मंडळांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, १२ महिने, ३ महिने किंवा गणेशोत्सवाच्या १० दिवसांसाठी नोंदणी करता येणार आहे. ३ महिने आणि १० दिवसांच्या नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती FDAचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी दिली.

अस्वच्छता आढळल्यास कारवाई

प्रसाद किंवा महाप्रसाद तयार करताना अस्वच्छता, घाणीचे वातावरण अथवा अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित मंडळावर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे अन्नदान करणाऱ्या गणेश मंडळांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणीची सुविधा

गणेश मंडळांना ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, त्यासाठी FDA/FSSAIची अधिकृत प्रक्रिया वापरता येईल. नोंदणीसाठी FOSCOS पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेश मंडळांनी अन्नदान सुरू करण्यापूर्वी आवश्यक नोंदणी पूर्ण करून नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती