सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

'महाआरोग्य गणेशोत्सव- २०२६' उपक्रमांतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे; श्री शिव छत्रपती मित्र मंडळ तर्फे आयोजन

डिजिटल पुणे    15-09-2026 10:10:44

 पुणे : श्री शिव छत्रपती मित्र मंडळ तर्फे  स्व. इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरांचे  आयोजन केले जात आहे. लायन्स क्लब ऑफ पुणे फोर्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुना  आय  फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ महाआरोग्य गणेशोत्सव -२०२६’ अंतर्गत नागरिकांसाठी  मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य उपक्रमांतर्गत दि.१५ ते २२ सप्टेंबरदरम्यान विविध वैद्यकीय तपासण्या आणि आरोग्यविषयक सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष  कान्होजी जेधे ,उपाध्यक्ष  प्रतीक खोपडे, खजिनदार बलराज वाडेकर,कार्याध्यक्ष  निरंजन सोमवंशी आणि  जयराज वाडेकर यांनी  केले आहे.श्री शिव छत्रपती मित्र मंडळ १३५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.त्यानिमित्त विविध सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजताशिबिरांचे उदघाटन होणार आहे.याच दिवशी  मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. बुधवार, १६ सप्टेंबर रोजी हिमोग्लोबिन, शुगर आणि रक्त दाब  तपासणी करण्यात येणार असून, गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी मोफत हाडांची तपासणी म्हणजेच बोन डेन्सिटी तपासणी केली जाणार आहे. शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदात्यांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

शनिवार, १९ सप्टेंबर रोजी मोफत दंत चिकित्सा शिबिर होणार आहे. रविवार, २० सप्टेंबर रोजी महिलांसाठी मोफत स्तनआरोग्य पूर्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवार २१ आणि मंगळवार २२ सप्टेंबर रोजी मोफत आयुष्मान भारत कार्ड योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याशिवाय नियम व अटी लागू असलेल्या मोफत डायलेसिस योजनेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व शिबिरे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत  जेधे मारुती मंदिर, पानघंटी  चौकाजवळ, गुरुवार पेठ, पुणे येथे होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती