सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 क्राईम

शारीरिक संबंधासाठी घरात घुसला; महिलेवर हल्ला करून जबरदस्ती, विरोध करताच गळा आवळून हत्या; बारामतीत खळबळ

डिजिटल पुणे    15-09-2026 12:54:42

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पणदरे एमआयडीसी परिसरात एका महिलेच्या घरात शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने प्रवेश करून तिच्यावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला अटक केली. वैशाली तानाजी पवार असे मृत महिलेचे नाव असून, गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी गणेश माने हा महिलेच्या घरात शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने शिरला. त्याने हातोड्याने महिलेवर हल्ला करून तिला जखमी केले. त्यानंतर जखमी अवस्थेत तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.महिलेने या प्रकाराला विरोध केला. त्यानंतर आपले कृत्य कुणाला समजू नये, या उद्देशाने आरोपीने टॉवेलच्या सहाय्याने तिचा गळा आवळल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला.महिलेच्या मृत्यूनंतर आरोपीने तिचे मंगळसूत्र आणि पायातील पैंजण घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील चोरीच्या अनुषंगानेही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

वैद्यकीय तपासणीत गंभीर बाबी समोर

मृत महिलेच्या वैद्यकीय तपासणीचा प्राथमिक अहवाल माळेगाव पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार महिला गर्भवती असल्याचे समोर आले आहे. तिच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर दुखापती आढळून आल्या आहेत. तसेच शरीरावर इतर दुखापतींचीही नोंद झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी गणेश माने याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनेमागील नेमकी कारणे, आरोपीची हालचाल तसेच गुन्ह्याशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.या घटनेने पणदरे एमआयडीसी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृत महिलेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलिसांकडून सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती