पुणे : १० सप्टेंबर २०२६ च्या राष्ट्रीय हरित लवाद पश्चिम विभाग बेंच च्या आदेशानुसार मूळ आदेशाचेच पालन कठोरपणे आवश्यक म्हणजेच शांतता क्षेत्रात कोणताही स्पीकरचा आवाज चालणार नाही. शांतता क्षेत्रात ४० ते ५० डेसिबलची मर्यादा आहे. याचाच अर्थ पुण्यातील शहरातील 121 आणि पिंपरी चिंचवड मधील 65 शांतता क्षेत्रात कोणताही स्पीकर लावता येणार नाही. याचाच अर्थ पुणे शहरांमधील पुना हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज, एस पी कॉलेज,नुमवी,अशोक विद्यालय, गरवारे शाळा, गरवारे कॉलेज, मॉडर्न कॉलेज, संचेती हॉस्पिटल, पुणे जिल्हा कोर्ट पासून 100 मीटर क्षेत्रात अशा कुठल्याही भागात स्पीकर आवाज चालणार नाही. हे क्षेत्र मोठे असून आता कुठे स्पीकर चालेल हे सरकारने ठरवायचे आहे. व सध्याच्या दिलेल्या परवानगी चा फेरविचार करणे भाग आहे. अन्यथा कोर्टाच्या अवमानाचा गुन्हा संबंधित आयुक्तांवर दाखल होवू शकतो.

2024 मधील राष्ट्रीय हरित आयोगाच्या म्हणजे एनजीटीच्या आदेशानुसार साधारणपणे याचे प्रोटोकॉल ठरवण्याच्या बाबतची ही केस होती व त्याप्रमाणे चाळीस मीटरच्या म्हणजे 120 फुटाच्या मंडपामध्ये 100 वॅटचा स्पीकर असावा तर तो साधारण 80 डेसिबलचा आवाज देतो असे कोर्टाने अभ्यासावरून म्हंटले आहे. आता प्रत्यक्षात पोलीस आयुक्तांनी दिलेल्या चार बेस्ट चार टॉपनुसार ही कपॅसिटी जवळपास 4000 वॅट बेस आणि 4000 वॅट टॉप असे होतात म्हणजेच याचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा 15 ते 25 डेसिबलने जास्त असतो. या आदेशानुसार पोलुशन कंट्रोल बोर्डाने या संदर्भात पोलिसांच्या मदतीने कारवाई करायची आहे. त्याचा *रियल टाईम डेटा वेबसाईटवर दाखवायचा आहे. अधिकाऱ्यांची माहिती वेबसाईटवर असणे आवश्यक आहे.

याबाबत लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचाने पोलीस आयुक्त यांना भेटून तसेच आंदोलनादरम्यान निवेदन दिलेले आहे. परंतु या संदर्भात अजूनही पोलीस आयुक्तांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, संभाजीनगर,नागपूर ,सोलापूर, धुळे, लातूर, भंडारा ,नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी डीजेवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून तर कोल्हापुरात दोन टॉप दोन बेस, सांगलीत एक टॉप एक बेस आणि पुण्यात मात्र चार टॉप चार बेस असे अशास्त्रीय मनमानी धोरण अवलंबले गेले आहे. तसेच रियल टाईम आवाज पातळीची नोंद कुठेही वेबसाईटवर प्रदर्शित केलेली नाही व अधिकाऱ्यांची यादी पण प्रदर्शित केलेली नाही. ही बेपर्वाई गंभीर आहे. *पुणेकरांच्याच बाबतीत असे असंवेदनशील धोरण गृहखाते का अवलंबते आहे?* यामागे पुण्याचे कारभारी भाजपच्या नेतृत्वातील अंतर्गत मतभेद कारणीभूत आहेत का?


- मुकुंद किर्दत,
लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच