सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उद्बोधन उपक्रम

डिजिटल पुणे    18-09-2026 10:37:03

पुणे : नव्याने राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी व राष्ट्रीय सेवा योजना संकल्पना माहीत होण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचे राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवकांसाठी एकदिवसीय उद्बोधन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश भंडारी, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. अनुपमा कदम, प्रा. सद्दाम घाटवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असताना प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी बाबुरावजी घोलप महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठा इतिहास असल्याचे नमूद करत छोट्या-छोट्या गोष्टींतून समाजाप्रती सेवेसाठी तत्पर असायला हवे असे मत व्यक्त केले. तसेच आपण करत असलेल्या सेवेचा मोबदला किंवा श्रेय न घेता निःस्वार्थ भावनेने काम करण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी माणसं वाचायला शिकली पाहिजे, असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी समाजहितासाठी काम करत असताना विद्यार्थ्यांनी स्वंयप्रेरणेने व स्वेच्छेने आपले भूमिका निभावली पाहिजे असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रा. शर्मिला देवकाते यांनी सुत्रसंचालन केले तर यशस्वितेसाठी डॉ. विजय घाडगे, डॅा. विजय बालघरे, प्रा. अनंत पवार, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, डॉ. अमृता इनामदार, डॉ. विद्या पठारे, डॉ. अपेक्षा नाकतोडे, प्रा. गणेश कटारिया, प्रा. प्रवीण खाडे, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रणित पावले, यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती