सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
 जिल्हा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; लोकभवन येथे रक्तदान शिबीर संपन्न

डिजिटल पुणे    18-09-2026 10:46:48

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनातर्फे दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

हे शिबीर इंडियन रेड क्रॉस सोसायटी, मुंबई शाखा, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट, नांदेड व इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. यावेळी लोकभवनचे अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व मुंबई तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

शिबिराला इंडियन रेड क्रॉस सोसायटी महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष होमी खुसरोखान, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुमेध चव्हाण, इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनचे सदस्य गोरक्ष गंभीरे, जेजे हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व रेड क्रॉस सोसायटी मुंबईचे तंत्रज्ञ उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती