पुणे : शहरातील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून ‘Safe Road PUNE 2026 – सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास, सुरक्षित पुणे’ या रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती अभियानांतर्गत शहरातील विविध भागांत जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.चतुशृंगी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी API राजकुमार केंद्रे व त्यांच्या पथकाने औंध गाव आणि शिवाजी विद्यालय परिसरात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान राबविले. वाहतूक नियमांचे संदेश देणारे फलक दाखवून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले. हेल्मेट वापरणारे दुचाकीस्वार आणि सीट बेल्टचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे गुलाबपुष्प देऊन कौतुक करण्यात आले.
फुरसुंगी वाहतूक विभागाचे PI राजेंद्र करणकोट व त्यांच्या पथकाने मंतरवाडी चौकात मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक-मालकांना अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे ५० ते ५५ टेम्पो चालक-मालक उपस्थित होते.बंडगार्डन वाहतूक विभागाचे API विशाल दांडगे व त्यांच्या पथकाने आरटीओ चौक आणि शाहीर अमर शेख चौकात एआयएसएसएमएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जनजागृती केली. तसेच अलंकार चौक आणि आयबी चौकात एस. जे. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ३० स्वयंसेवकांच्या मदतीने विशेष अभियान राबविण्यात आले. यमराजाच्या प्रतीकात्मक वेशभूषेत पथनाट्य सादर करून विना हेल्मेट वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले. नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
लष्कर वाहतूक विभागाचे API विद्या सावंत व त्यांच्या पथकाने देसाई हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर घेतले. यामध्ये २७ रिक्षाचालक, ५५ स्कूल बस चालक आणि वाहतूक विभागातील अंमलदार, अशा एकूण ८२ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. सुरक्षित वाहनचालना आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.दरम्यान, वानवडी वाहतूक विभागाच्या PI संगीता जाधव व त्यांच्या पथकाने पुणे-सोलापूर रोडवरील टर्फ क्लब ते भैरोबा नाला चौकादरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजवून रोड सरफेसिंग करून घेतले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन
दुचाकी चालविताना दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा, रस्ता ओलांडताना पादचारी मार्ग आणि झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा, वाहतूक सिग्नलचे काटेकोरपणे पालन करावे, अतिवेगाने वाहन चालवू नये आणि वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.रस्त्यावर अपघात झाल्यास जखमी व्यक्तीला तातडीने मदत करून वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. वाहतूक नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असा संदेश वाहतूक पोलिसांनी दिला.‘Safe Road PUNE 2026 – सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास, सुरक्षित पुणे’ या अभियानातून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघातमुक्त आणि सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे शहरातील वाढते प्राणांकित अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी
1) *चतुशृंगी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी API राजकुमार केंद्रे व त्यांचे टीमने औंध गाव व शिवाजी विद्यालय परिसरामध्ये शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या मदतीने रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले सदर वेळी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी जनजागृती पर फलक दाखवून हेल्मेट परिधान करणारे दुचाकीस्वार व सीट बेल्टचा वापर करणारे वाहन चालक यांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक केले व जनजागृती केली *
2) फुरसुंगी वाहतूक विभागाचे PI राजेंद्र करणकोट व त्यांचे टीमने मंतरवाडी चौक येथे मालवाहतूक करणारे टेम्पो चालक-मालक यांना गंभीर अपघात होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता बाबत सूचना देऊन जनजागृती केली सदर वेळी 50 ते 55 टेम्पो ट्रान्सपोर्ट मधील चालक-मालक हजर होते .
3) बंडगार्डन वाहतूक विभागाचे API विशाल दांडगे व त्यांची टीमने आरटीओ चौक, शाहीर अमर शेख चौक येथे ए आय एस एस एम एस कॉलेज मधील विद्यार्थी यांचे सह रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती अभियानाची आयोजन करून सदर चौकामध्ये वाहतूक सूचनाफलक दाखवून रस्ता सुरक्षा बाबत वाहन चालकांमध्ये जनजागृती केली * तसेच अलंकार चौक व आयबी चौक येथे S J Contraction co.Ltd कंपनीच्या 30 स्वयंसेवकांच्या मदतीने विशेष जनजागृती करण्यात आली त्यात यमराजाच्या प्रतीकात्मक वेशभूषेतील व्यक्तीमार्फत पथनाट्य सादर करून विना हेल्मेट वाहन वाहनचालकांचे प्रबोधन करून हेल्मेट परिधान केलेल्या व नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या
4) लष्कर वाहतूक विभागाचे API विद्या सावंत व त्यांचे टीमने देसाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 27 रिक्षा चालक, 55 स्कूल बस चालक व विभागाचे अंमलदार असे एकूण 82 व्यक्तींचे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून अपघात टाळण्यासाठी जनजागृती अनुषंगाने सूचना दिल्या.
5) वानवडी वाहतूक विभागाच्या PI संगीता जाधव व त्यांच्या टीमने पुणे सोलापूर रोड वरील टर्फ क्लब ते भैरोबा नाला चौक दरम्यान रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवून घेऊन रोड सरफेसिंग करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित व सुरळीत करून घेतला आहे

वाहनचालक व नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येते
1. दुचाकी चालविताना नेहमी दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा.
2. रस्ता ओलांडताना पादचारी मार्ग व झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा .
3. वाहतूक सिग्नलचे काटेकोरपणे पालन करावे.
4. अतिवेगाने वाहन चालवू नये. वेगावर नियंत्रण ठेवावे.
5. वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये.
6. रस्त्यावर अपघात झाल्यास जखमी व्यक्तीस तातडीने मदत करून वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत .
वाहतूक नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे.
सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करा!
“Safe Road PUNE 2026–सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास, सुरक्षित पुणे
पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर .
