सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का? बिहारमधील जमुई येथील प्रकाराबाबत रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त
  • मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; देशात पावसाची 15 टक्के तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
 शहर

राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदार यादीत नाव नोंदवा डॉ. तुषार शितोळे

डिजिटल पुणे    22-09-2026 14:48:46

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड, राष्ट्रीय सेवा योजना, युथ रेड क्रॉस युनिट, निवडणुक साक्षरता मंडळ,राज्यशास्त्र विभाग व २१० कोथरूड मतदार संघ मतदार नोंदणी  कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात नव मतदान नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले यावेळी डॉ.तुषार शितोळे, डॉ.शुभांगी औटी, डॉ.श्रीनिवास इपलपल्ली, डॉ.आदिनाथ पाठक, डॉ.सपना राणे, डॉ.रुपाली शेंडकर, डॉ.योगेश पवार मतदार नोंदणी अधिकारी,दिनेश टिळेकर,संदीप जाधव, मोहन बेनकर, संदीप आवळे  उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. तुषार शितोळे म्हणाले "भारताची लोकशाही व्यवस्था ही जगातील मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही टिकविण्याची व अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी ही आजच्या तरुण पिढीवर आहे. पारदर्शक निवडणुका हा या लोकशाहीचा गाभा आहे. त्यासाठी मतदार याद्या निर्दोष असणे आवश्यक आहे. ही यादी निर्दोष, पारदर्शक, परिपूर्ण व अधिक अचूक असावी व कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

वंचित, बेघर, तृतीयपंथीय, महिला, युवक अशा घटकांच्या हातात लोकशाहीच्या नाड्या आहेत. तेच जर या प्रक्रियेच्या बाहेर असतील तर लोकशाही बळकट कशी होणार. म्हणून तरुणांना, वंचित समाजातील घटकांना प्रवाहात आणण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदार यादीत नाव नोंदवा." असे आवाहन केले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे व मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोरे, डॉ.अशोक शेळके, प्रा.रचना कोळपे, प्रा.निकिता कदमबांडे, प्रा.प्रशांत एखांडे, प्रा.अभिजित शिंदे, डॉ.भुजंग सवाईशिर्के, प्रा.कीर्ती करंजावणे यांनी केले.

 


 Give Feedback



 जाहिराती