सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्लास्टिक संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    23-09-2026 13:29:13

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातर्फे आयोजित प्लास्टिक संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभाग, ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या संयुक्त विद्यामाने या पर्यावरण पूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रीन क्लब समन्वयक डॉ. राणी भगत, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. नागेश भंडारी, डॉ. ज्ञानेश्वर जांभूळकर, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी डॉ. विठ्ठल नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या पर्यावरण विषयक विचार व कार्यातून आदर्श घेत महाविद्यालय दादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर कटीबद्ध असून त्या अनुषंगाने विविध पर्यावरण पुरक उपक्रम राबवण्यावर महाविद्यालयाचा भर असेल, असे नमूद केले. सदर प्लास्टिक संकलन अभियानामध्ये महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभाग, ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी, स्वयंसेवक व छात्रांनी महाविद्यालय परिसर, क्रीडांगण, पदव्युत्तर शिक्षण विभाग व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करत प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुर्ण महिनाभरात घरांमध्ये वापरलेल्या दुधाच्या पिशव्या, प्लास्टिक बॅाटल्स, प्लास्टिक आवरण व इतर प्लास्टिक टाकाऊ पदार्थ असा एकूण २० किलो प्लास्टिक कचरा जमा करून पुढील प्रक्रियेसाठी तो सागरमित्र आभियान, पुणे या पर्यावरणवादी स्वंयसेवी संस्थेकडे जमा करण्यात आला. याकरिता कमिन्स ग्रुप, इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत असल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांनी बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले असून सर्व स्तरातून महाविद्यालयांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्लास्टिक संकलन अभियानाच्या यशस्वितेसाठी डॉ. विशाल पावसे, डॉ. रमाकांत कसपटे, प्रा. सुदर्शन लखदिवे, डॉ. विद्या पाठारे, प्रा. अनुपमा कदम, प्रा. सद्दाम घाटवाले, प्रणित पावले यांच्यासह यांच्यासह विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती