सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 विश्लेषण

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न; ढोल-ताशांच्या गजरात पुणेकरांचा भावपूर्ण निरोप

डिजिटल पुणे    25-09-2026 19:07:04

पुणे :पुण्यातील गणेशोत्सवाच्या १२ दिवसांच्या उत्साहानंतर आज शुक्रवारी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात पुणेकरांनी आपल्या लाडक्या गणपतींना भावपूर्ण निरोप दिला.  पुण्यातील गणेशोत्सवाच्या उत्साहाची सांगता शुक्रवारी मानाच्या पाचही गणपतींच्या भव्य विसर्जनाने झाली. सकाळी पावणेदहा वाजता मंडई परिसरातून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक दिवसभर पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात सुरू होती. हजारो पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. सांयकाळी सहा वाजता मानाचे सगळ्या गणपतीचे विसर्जन पार पडलं. 

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.४५ वाजता मंडईतून सुरुवात झाली. कसबा गणपती सायंकाळी ४.४१ वाजता विसर्जित करण्यात आला. त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती याची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होऊन सायंकाळी ५.०१ वाजता विसर्जन करण्यात आले.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती याची मिरवणूक सकाळी १०.१५ वाजता सुरू झाली. सायंकाळी ५.०५ वाजता गणपतीचे विसर्जन पार पडले. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती सकाळी १०.४५ वाजता मिरवणुकीत सहभागी झाला आणि सायंकाळी ५.३४ वाजता विसर्जन करण्यात आले

दरम्यान, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती याची मिरवणूक सकाळी ११.१० वाजता मंडईतून सुरू झाली. दुपारी ३ वाजता बेलबाग चौकात पोहोचल्यानंतर सायंकाळी ६.११ वाजता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन वेळापत्रक

पावणेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात, पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे सहा वाजता विसर्जन, 

- मानाचा पहिला कसबा गणपती — सायंकाळी ४.४१ वाजता

 

- मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती — सायंकाळी ५.०१ वाजता

- मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती — सायंकाळी ५.०५ वाजता

- मानाचा चौथा तुळशीबाग गणपती — सायंकाळी ५.३४ वाजता

- मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती — सायंकाळी ६.११ वाजता

ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला. गणरायाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत भक्तिभाव आणि विरहाचे भाव पाहायला मिळाले. यासह पुण्यातील यंदाच्या गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण सांगता झाली.


 Give Feedback



 जाहिराती