सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

पथविक्रेत्यांच्या योजनेसाठी राज्य नागरी विकास संस्थेकडे निवेदन; ३० ऑक्टोबरपर्यंत योजना जाहीर न झाल्यास न्यायालयीन लढ्याचा इशारा

डिजिटल पुणे    26-09-2026 11:45:09

पुणे : जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघ या संघटनेच्या वतीने पुणे महानगरपालिका हद्दीतील पथविक्रेत्यांच्या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य नागरी विकास संस्थेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राजीव नंदकर यांची 'यशदा' येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पुणे महापालिका हद्दीतील सर्व पथविक्रेत्यांचा योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय आल्हाट आणि पुणे जिल्हाध्यक्ष परमेश्वर राजगुरू यांनी नंदकर यांची भेट घेतली. पुणे महापालिका हद्दीतील सर्व पथविक्रेत्यांची योजनेमध्ये दखल घेण्यात येईल, असे आश्वासन नंदकर यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, उच्च न्यायालयाने २९ एप्रिल २०२६ रोजी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीतील पाच महिने उलटूनही पुणे महापालिकेने अद्याप योजना तयार केलेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत योजना जाहीर न झाल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यासंदर्भात पथविक्रेत्यांच्या विविध भागांमध्ये बैठका घेऊन पुढील न्यायालयीन लढ्याची तयारी करण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले.

या बैठकींमध्ये पथविक्रेत्यांनी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र तसेच पथारीचा फोटो यांसह आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पथविक्रेत्यांना संघटित करण्यासाठी लवकरच भागनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

 


 Give Feedback



 जाहिराती