सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 क्राईम

ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भोजपुरी अभिनेत्रीला अटक, दोन तरुणींची सुटका

डिजिटल पुणे    28-09-2026 10:52:07

ठाणे : तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायात ओढल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने 25 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीला अटक केली आहे. पोलिसांनी तिच्या ताब्यातून दोन तरुणींची सुटका केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील पडवळनगर भागात असलेल्या ‘हॉटेल साई टच रेस्टॉरंट अँड बार’ येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित अभिनेत्री भोजपुरी चित्रपट तसेच वेबसीरिजमध्ये काम करत होती. ती तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. शनिवारी दुपारी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत अभिनेत्रीला ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान दोन तरुणींची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी अभिनेत्रीने आतापर्यंत सुमारे 10 वेबसीरिज आणि तीन भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तरुणींना नेमक्या कोणत्या पद्धतीने या जाळ्यात ओढले जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती