सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 जिल्हा

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश

डिजिटल पुणे    01-10-2026 10:57:04

मुंबई : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन उपाययोजना सुचविणे आणि परिस्थितीचे संनियंत्रण करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने २९ सप्टेंबरला याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या ११ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मंत्री नितेश राणे यांचा समावेश करण्याचा निर्णय २९ सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीच्या आढाव्यात मत्स्यव्यवसायाशी संबंधित बाबींचाही यापुढे समावेश होणार आहे. राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेणे, आवश्यक उपाययोजना सुचविणे तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही उपसमिती कार्य करणार आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून नितेश राणे यांचा समितीत समावेश महत्वाचा ठरला आहे.

मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आलेला असल्याने दुष्काळी परिस्थितीचा परिणाम होणाऱ्या मच्छिमार आणि मत्स्य उत्पादकांच्या प्रश्नांकडेही या समितीच्या माध्यमातून लक्ष देण्यात येणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित घटकांसाठी आवश्यक मदत व उपाययोजनांबाबतच्या निर्णयप्रक्रियेत मंत्री नितेश राणे यांचा सहभाग राहणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती