सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 जिल्हा

‘एमएसपी’अंतर्गत खरेदी केलेल्या धान व भरडधान्याची प्रलंबित देयके तातडीने अदा करा – मंत्री छगन भुजबळ

डिजिटल पुणे    01-10-2026 12:40:35

मुंबई : किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेंतर्गत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या धान व भरडधान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठी प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले.पणन हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांची खरेदी करण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार धानाची १,०३,८०,१९६.७० क्विंटल, ज्वारीची ५५,१८३.७० क्विंटल, मक्याची १०,०५,१११ क्विंटल, बाजरीची ५१०.५० क्विंटल आणि रागीची ४,६२४ क्विंटल खरेदी झाली आहे.  तसेच रब्बी पणन हंगामातील खरेदीमध्ये धान, ज्वारी आणि मका यांचा समावेश असून उपलब्ध नोंदीनुसार एकूण १,०८,२१,४०४.६० क्विंटल खरेदी झाल्याचे नमूद आहे. शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली रक्कम तसेच अद्याप अदा करावयाच्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहिती संकलित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित धान व भरडधान्याची हमीभावाची रक्कम मिळण्यासाठी अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी प्रलंबित देयकांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. एमएसपी योजनेंतर्गत खरेदी प्रक्रियेत सहभागी सर्व संबंधित यंत्रणांनी उपलब्ध निधी, प्रलंबित देयके आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांची देयके प्राधान्याने अदा करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

“शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची हमीभावाची रक्कम वेळेत मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रलंबित देयकांच्या बाबतीत कोणताही अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही, असे मंत्री छगन भुजबळ यांनी यंत्रणांना निर्देश दिले.

 


 Give Feedback



 जाहिराती