सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

डिजिटल पुणे    03-10-2026 13:13:04

पुणे :राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. विशेष दिन समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. चंदा हासे, विशेष दिन समिती समन्वयक डॉ. विजय बालघरे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश भंडारी, परीक्षा अधिकारी डॉ. सुभाष वाव्हळ, ग्रंथपाल डॉ. विठ्ठल नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयातील पर्यटन विभाग प्रमुख प्रा. सद्दाम घाटवाले यांनी ‘जय जवान, जय किसान' चा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला तर विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी आज प्रत्येक विषय व क्षेत्रामध्ये गांधीजींच्या विचारांचे अनुसरून केले जाते असे नमूद करत गांधीजींच्या विचारांचे वेगळेपण उपस्थितांसमोर स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण चाळके, प्रा. अनंत पवार, प्रा. शर्मिला देवकाते, डॉ. दिपाली चिंचवडे, डॉ. संदिप भोसले, डॅा. राजेंद्र भोईवार, प्रा. ज्योती यंदे, डॉ. अश्विनी कदम, प्रा. काजल कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असून प्रणित पावले यांनी विशेष तांत्रिक सहकार्य केले.


 Give Feedback



 जाहिराती