सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 शहर

१० ऑक्टोबर रोजी 'गंधार रंजन' सांगीतिक कार्यक्रम

डिजिटल पुणे    05-10-2026 10:52:56

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'स्वरगंध' प्रस्तुत 'गंधार रंजन' हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दोन गंधार असलेल्या रागांवर आधारित शास्त्रीय व सुगम संगीत रचनांचा गायन-वादनातून आविष्कार या कार्यक्रमात सादर होणार आहे. यात माधवी करंदीकर (हार्मोनियम), डॉ. नीलिमा राडकर (व्हायोलिन) हे कलाकार सहभागी होणार असून डॉ. राजश्री महाजनी आणि सोमनाथ जायदे यांचे गायन,अभिजित जायदे यांची तबला साथ लाभणार आहे.निवेदन यशश्री पुणेकर करणार आहेत.

हा कार्यक्रम शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता,पुणे येथे होणार आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रस्तुत हा ३०७ कार्यक्रम आहे, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. प्रवेश विनामूल्य आहे.


 Give Feedback



 जाहिराती