सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 शहर

पुण्यात राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांची दुष्काळावर मंथन बैठक; ६ ऑक्टोबरला कृती कार्यक्रम ठरणार

डिजिटल पुणे    05-10-2026 10:58:37

पुणे : यंदा सरासरीच्या केवळ ५० टक्क्यांच्या आसपास पाऊस झाल्याने मराठवाड्यासह राज्यातील अनेक तालुक्यांत गंभीर दुष्काळाची शक्यता निर्माण झाली आहे. तीव्र पाणीटंचाई, चाऱ्याची कमतरता, शेतीसमोरील संकट आणि रोजगाराचा प्रश्न या पार्श्वभूमीवर ठोस कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी पुणे शहरात राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मराठवाडा समन्वय समिती आणि एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन यांच्या वतीने ही बैठक मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, गांजवे चौक, पुणे येथे होणार आहे.

शासनाने काही उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता त्या अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याची गरज आहे. शासनाशी संवाद, पाठपुरावा आणि आवश्यक तेथे लोकशाही मार्गाने संघर्ष करून दुष्काळग्रस्त भागासाठी भरीव मदत मिळवणे, तसेच समाज म्हणून आपण काय योगदान देऊ शकतो, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

पुण्यात राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांनी आणि या संकटात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे आणि मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे -पाटील यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी उपेंद्र टण्णू (9881701881) आणि ॲड. विलास राऊत (9923903465) यांच्याशी संपर्क साधावा.

 


 Give Feedback



 जाहिराती