सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड
  • जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
  • शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 क्राईम

टीव्हीवरून भावंडांमध्ये वाद; वडिलांनी बॅटने मुलीच्या डोक्यात घातला घाव, साताऱ्यात १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

डिजिटल पुणे    05-10-2026 15:40:27

सातारा : टीव्ही पाहण्यावरून भावंडांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण लागून १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील गोडोली परिसरात घडली. वडिलांनी बॅटने मुलीच्या डोक्यात प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी तिचे वडील पुरुषोत्तम संपत कदम यांना अटक केली आहे. कदम हे व्यवसायाने शिक्षक असल्याची माहिती आहे.मृत मुलीचे नाव आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७) असे आहे. शनिवारी (३ ऑक्टोबर) रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून, रविवारी सायंकाळी प्रकरण उघडकीस आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम कदम हे पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह गोडोली परिसरात राहत होते. आर्या सतत टीव्ही आणि मोबाईलमध्ये व्यस्त राहत असल्याने तसेच तिच्या आक्रमक वर्तनामुळे घरात वारंवार वाद होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तिच्यावर पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

शनिवारी रात्री टीव्ही पाहण्यावरून आर्या आणि तिच्या भावंडांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान आर्याने बहिणीच्या डोळ्यावर ठोसा मारल्याने तिच्या डोळ्याला दुखापत झाली. हा प्रकार पाहून वडिलांनी आर्याला शांत राहण्यास सांगितले.

मात्र, त्यानंतर आर्या वडिलांवरच संतापून बॅट घेऊन धावून गेल्याचा आरोप आहे. यावेळी संतापाच्या भरात पुरुषोत्तम कदम यांनी तिच्याच हातातील बॅटने आर्याच्या डोक्यावर प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्याने आर्या घरातच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर वडिलांनी पोलिसांना वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. मात्र, पोलिसांनी आर्याच्या आईची चौकशी केल्यानंतर घटनेचे गांभीर्य स्पष्ट झाले. पतीने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात बॅट मारल्याची माहिती तिने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येते.या प्रकरणी सातारा पोलिसांनी पुरुषोत्तम कदम यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती