सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड
  • जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
  • शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 जिल्हा

‘एकल महिला सक्षमीकरण, संरक्षण व सर्वांगीण विकास धोरण २०२६’ राज्यात लवकरच लागू – मंत्री आदिती तटकरे

डिजिटल पुणे    06-10-2026 16:25:23

मुंबई : अवलंबित्वाशिवाय स्वतंत्र जीवन जगणाऱ्या महिलांचाही एकल महिला धोरणात समावेश करण्यात येणार आहे. महिलांचा सन्मान, समानता, स्वायत्तता, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन या व्यापक दृष्टिकोनातून आखण्यात येत असलेले ‘एकल महिला सक्षमीकरण, संरक्षण व सर्वांगीण विकास धोरण २०२६’ राज्यात लवकरच राबविण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.बाल धोरण, एकल महिला धोरण, पिंक ई-रिक्षा, आदिशक्ती अभियान पुरस्कार आणि फिरत्या पथकांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा, सहसचिव वि. रा. ठाकूर, उपसचिव आनंद बोंडवे, उपायुक्त जे. बी. गिरासे, अवर सचिव दिपाली तिडके, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी, श्री. सरदार, कक्ष अधिकारी निलेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सामाजिक सुरक्षा व मूलभूत नागरिक हक्क, आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण व पाल्यांचे संरक्षण, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य, निवारा व गृहनिर्माण, मालमत्ता व वारसा हक्क, कायदेशीर संरक्षण, विशेष परिस्थितीतील महिला, शासन तसेच डेटा व डिजिटल प्रणाली या दहा धोरणात्मक क्षेत्रांवर काम करणे आवश्यक आहे. धोरणाशी संबंधित सहा विविध समित्यांमध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश करावा.

सामाजिक सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण, रोजगार, कौशल्य, शिक्षण, आरोग्य, निवारा, मालमत्ता व वारसा हक्क, कायदेशीर संरक्षण, सामाजिक समावेशन आणि पाल्यांचे संगोपन या बाबींचा समावेश करून धोरणाची मुख्य दिशा निश्चित करण्यात आली आहे. हे धोरण एकल महिलांसाठी मार्गदर्शक आणि सहाय्यकारी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका क्षेत्रांतील एकल महिलांची अद्ययावत माहिती एकत्रित करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. जिल्हा परिषद क्षेत्रांतील एकल महिलांची संख्या २३ लाख ९५ हजार असून, मोठ्या शहरांतील आकडेवारीचा समावेश झाल्यानंतर या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही एकल महिलांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांच्या समस्या जाणून घेऊन धोरणात आवश्यक बाबींचा समावेश करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.आदिशक्ती अभियान शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात राबवून प्रभाग समित्यांनुसार कामकाज करावे, असे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. बैठकीत फिरती पथके आणि पिंक ई-रिक्षा उपक्रमाचाही आढावा घेण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती