सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू
  • पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा; खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेची हालचाल
  • चाकणमध्ये अतिक्रमणांचा कहर; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
  • रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात
 विश्लेषण

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या न्याय्य; मात्र पुणे शहर बंद करण्याची भूमिका चुकीची;पुणे शहर बंद करून पुणेकरांना वेठीस धरू नका – प्रमोद नाना भानगिरे

डिजिटल पुणे    07-10-2026 10:50:23

पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुकारलेल्या पुणे बंदच्या भूमिकेवर शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या न्याय्य असून त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे; मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या निमित्ताने संपूर्ण पुणे शहर बंद करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी पुणे बंदच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन भानगिरे यांनी केले.

एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार आणि संबंधित यंत्रणांनी सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी अपेक्षा भानगिरे यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यांनी तो लढा सुरू ठेवावा; मात्र या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य पुणेकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की,“रोहित पवार यांनी पुणे बंदची केलेली घोषणा ही राजकीय भूमिका आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत आणि त्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवावा. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संपूर्ण पुणे शहर बंद करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे? विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी लढा जरूर द्यावा; मात्र त्यासाठी पुणेकरांना वेठीस धरू नये,” 

संपूर्ण पुणे शहराची व्याप्ती मोठी असून शहराची अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांवर अवलंबून आहे. कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, रिक्षाचालक, सेवा क्षेत्रातील कर्मचारी तसेच रोजच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या असंख्य नागरिकांचे व्यवहार शहराशी जोडलेले आहेत.

त्यामुळे संपूर्ण शहर बंद ठेवण्याच्या निर्णयाचा थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर, व्यवसायावर आणि दैनंदिन व्यवहारावर होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढताना सर्वसामान्य पुणेकरांच्या रोजगाराला आणि दैनंदिन जीवनाला फटका बसणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे भानगिरे यांनी सांगितले.

आज एका मागणीसाठी संपूर्ण पुणे शहर बंद करण्याची भूमिका घेतली, तर भविष्यात प्रत्येक प्रश्नासाठी शहर बंद करण्याचा राजकीय पायंडा पडू शकतो. आंदोलन करण्याचा लोकशाही अधिकार निश्चितच आहे; मात्र त्या आंदोलनामुळे सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना वेठीस धरण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये.

विद्यार्थ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत, त्यामुळे त्यांच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने प्रभावीपणे आवाज उठवला पाहिजे,पुणे हे लाखो नागरिकांच्या रोजगाराचे आणि दैनंदिन जीवनाचे केंद्र आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे बंद करण्याचा निर्णय घेताना त्याचा सर्वसामान्य पुणेकरांवर होणारा परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवावा; मात्र पुणेकरांना वेठीस धरणारी भूमिका टाळावी. रोहित पवार यांनी पुणे बंदच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा,” असे प्रमोद नाना भानगिरे यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती