पुणे : पुणे शहरात एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुणे शहरात एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.एस. एम. जोशी पूल व पत्रकार भवन परिसरात आंदोलनामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले असून, या परिसरातील वाहतूक कोंडीचा परिणाम लगतच्या रस्त्यांवरही जाणवत आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, एस. एम. जोशी पूल व पत्रकार भवन परिसरात आंदोलनामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले असून, या परिसरातील वाहतूक कोंडीचा परिणाम लगतच्या रस्त्यांवरही जाणवत आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Google च्या Traffic monitoring system मधील उपलब्ध वाहतूक आकडेवारीनुसार पुणे शहरातील सुमारे 1,000 किमी रस्त्यांवरील वाहतुकीचे दररोज व तासानुसार निरीक्षण केले जाते. मागील सहा महिन्यांतील उपलब्ध आकडेवारीचा तुलनात्मक आढावा घेतल्यास, एस. एम. जोशी पूल परिसरात आंदोलन सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी आणि congestion alerts मध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येते
या वाहतूक कोंडीचा परिणाम केवळ सर्वसामान्य वाहनचालकांपुरता मर्यादित न राहता रुग्णवाहिका, रुग्णालयात जाणारे रुग्ण, अग्निशमन वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या वेळेवर होणाऱ्या हालचालींवर होऊ शकतो. त्यामुळे आंदोलनस्थळी व लगतच्या प्रमुख मार्गांवर वाहतूक सुरळीत राहणे आणि अत्यावश्यक सेवांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यास विशेष प्राधान्य देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अधिकाराचा आदर राखत, नागरिकांची गैरसोय कमीत कमी होईल आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत राहतील, यासाठी आंदोलक, वाहनचालक आणि नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
वाहनचालकांनी शक्यतो एस. एम. जोशी पूल–पत्रकार भवन परिसर टाळून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून अनावश्यकपणे रस्त्यावर वाहन थांबवू नये, जेणेकरून वाहतुकीची कोंडी कमी करण्यास मदत होईल.