सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी ,प्रियंका गांधीं यांना पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  • पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू
  • पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा; खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेची हालचाल
  • चाकणमध्ये अतिक्रमणांचा कहर; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
  • रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात
 शहर

महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात विविध स्पर्धांचे निकाल जाहीर; पुणे, नागपूर, मुंबईच्या पोलिसांची चमकदार कामगिरी

डिजिटल पुणे    07-10-2026 19:39:11

पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ नुकताच सुरू झाला असून, विविध क्षेत्रांतील अनुभवी व निष्णात पंचांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडत आहेत. या कर्तव्य मेळाव्यातील विविध उपस्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

Anti Sabotage Check अंतर्गत Room Search या स्पर्धेत सुवर्ण पदक श्री. ओमकार गणपतराव भोसले (पोलीस शिपाई, एस.आर.पी.एफ. परिसर) यांनी पटकावले. रजत पदक श्री. सागर हुमत गायकवाड (पोलीस हवालदार, एस.आर.पी.एफ. परिसर) यांना, तर कास्य पदक श्री. पंकज हुल्ले (पोलीस हवालदार, गडचिरोली परिसर) यांना मिळाले.

Scientific Aid To Investigation अंतर्गत Officer's Photography स्पर्धेत सुवर्ण पदक श्रीमती भारती शेंगाळे (पोलीस निरीक्षक, एटीएस), रजत पदक श्री. पावले बले (सहाय्यक पोलीस निरीक्षक, एटीएस) आणि कास्य पदक श्रीमती राधा शिरे (पोलीस उपनिरीक्षक, सीआयडी, पुणे) यांनी पटकावले.

 

Observation Test स्पर्धेत सुवर्ण पदक श्रीमती प्रतिमा नागपुरे (महिला पोलीस शिपाई, नागपूर शहर), रजत पदक श्री. सतीश पाटील (एटीएस) आणि कास्य पदक श्री. एस. के. पाटील (कोकण परिक्षेत्र) यांनी मिळवले.

Portrait Test मध्ये सुवर्ण पदक श्री. मेघा आकोरे (पोलीस हवालदार, अमरावती परिक्षेत्र), रजत पदक श्रीमती प्रतिक्षा नागपुरे (महिला पोलीस शिपाई, नागपूर शहर) आणि कास्य पदक श्रीमती रोशिका घाईवत (महिला पोलीस हवालदार, नागपूर शहर) यांनी पटकावले.

तसेच Anti Sabotage Check अंतर्गत Access Control स्पर्धेत सुवर्ण पदक श्री. उमेश सिताराम बाबर (पोलीस शिपाई, फोर्स वन), रजत पदक श्री. महेश राजेंद्र खाटमोडे (पोलीस नाईक, एमएपी) आणि कास्य पदक श्री. निलेश शिवाजी साळुंखे (पोलीस हवालदार, फोर्स वन) यांनी मिळवले.

 

 

Scientific Aid To Investigation अंतर्गत Crime Investigation – Criminal Law Rules & Procedure and Court Judgment या स्पर्धेत सुवर्ण पदक श्री. प्रशांत ढाबरे (पोलीस निरीक्षक, नागपूर शहर), रजत पदक श्री. सुरज गायकवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई शहर) आणि कास्य पदक श्री. दीपक शिरोरे (पोलीस निरीक्षक, नवी मुंबई) यांनी पटकावले.

विजेत्या स्पर्धकांचा सत्कार ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता राज्य राखीव बल गट क्र. २ येथे विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, पुणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

 


 Give Feedback



 जाहिराती